पुरंदर रिपोर्टर. Live
विजय लकडे
पुणे - पंढरपूर महामार्गावर पिंपरे गावाजवळ आज भीषण अपघात घडला असून, एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा एक पाय मोडला असून, त्याच्यावर तातडीने उपचारासाठी पुणे येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघात आज दुपारी पंढरपूर होऊन स्वारगेट दिशेने जाणारी एसटी बस (क्रमांक MH 14 LX 6227) पुणे पंढरपूर महामार्ग लगत असणाऱ्या पिंपरे गावातील पेट्रोल पंपासमोर आली असता घडला. जेजुरीकडून निरा दिशेने येणारी दुचाकी (क्रमांक MH 14 BG 2055) समोरून आल्याने दोनही वाहनांची भीषण धडक झाली.
या धडकेत दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला असून, (अद्याप ओळख पटलेली नाही) त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने पुणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे पुणे - पंढरपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि निरा पोलीस चौकीचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. सदर अपघाताबाबत पुढील तपास निरा पोलीस करत आहेत.
पिंपरे गावातील नागरिकांनी अशा अपघातांवर आळा बसावा यासाठी रस्त्यावरील सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
0 Comments