सातारा: प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्याच अल्पवयीन मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, कारण या घटनेतून पीडित अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.संबंधित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून मुलाने पीडित अल्पवयीन तरुणीशी शेतात नेऊन दोन वेळा शारीरिक संबंध ठेवले.
हा प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी मुलाने मुलीला दिली होती. मात्र, मुलगी 8 महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना संपूर्ण प्रकरण कळले. या गंभीर प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाविरुद्ध तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत, संबंधित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून या घटनेमुळे समाजात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पालकांनी आणि प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मत आता व्यक्त होत आहे.
0 Comments