फलटण-(बरड ) : सुनिल नरुटे
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूरहून आलेल्या दोन वारकऱ्यांचा फलटणजवळ विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे अशी मृत भाविकांची नावे आहेत. या भाविकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबिय व वारकरी समुदायावर शोककळा पसरली आहे.
आळंदी ते पंढरपूर निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूरमधील राजाबाक्षा येथील मधुकर शेंडे व तुषार रामेश्वर बावनकुळे हे दोन वारकरी आले होते. पायी वारीदरम्यान फलटणजवळ (बरड) विसाव्यासाठी थांबले होते. यावेळी टेंट उभारण्याच्या कामात व्यस्त असताना तुषार यांचा हात चुकून लोखंडी रॉडला लागला. ज्यामुळे त्यांना विजेचा जोरात धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी सरसावलेल्या मधुकर शेंडे यांनाही विजेचा धक्का बसून या घटनेत दोघांचाही जाग
मधुकर शेंडे आणि तुषार बावनकुळे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. दोन्ही कुटुंबे ही मध्यमवर्गीय आहेत. मधुकर व तुषार हे दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. वारकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पायी चालत येतात. मात्र, अशा मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी वारी करत असतात. मात्र, यंदाच्या वारीत फलटणमधील बरड येथे पालखी मुक्कामी असताना या दोन भाविकांचा अनपेक्षित मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.
0 Comments