पुरंदर प्रतिनिधी | निरा प्रतिनिधी
पुणे-पंढरपूर महामार्गावरील निरा नदीजवळील पालखी तळाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभी असलेली सुझुकी क्र. MH12 XH 3264 या गाडीला लोणंद येथून निघालेल्या केअरवोल्ट (क्र. MH04 HN 4208) या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या गाडीत कोणीही नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही, केअरवोल्ट अमेय बागवान रा. अहिल्यानगर किरकोळ जखमी झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
अपघातानंतर वाहनचालक सुरक्षित असून, रस्ता चुकल्यामुळे हा अपघात झाला असं प्रत्यक्ष दर्शन सांगणं आहे. निरा पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. महामार्गावर सध्या वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
या अपघातामुळे पालखी मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
0 Comments