भिगवण:प्रतिनिधि
बारामती भिगवण राज्य महामार्गावरती गुरुवारी (दि. 5) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रक व दुचाकीच्या धडकेत 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव अक्षय बबन आव्हाड (रा. खानापूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर) असे असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण अक्षय आव्हाड हा बारामती अॅग्रो कारखाना शेटफळगडे वरती नातेवाईकाच्या कन्स्ट्रक्शन साईट वरती काम करीत होता. रात्री आठ वाजता काम आटोपल्यानंतर शेटफळगडे मधून तो आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना दुचाकीची ट्यूब ही खराब झाल्याने तो शेटफळगडे मध्ये नवीन ट्यूब टाकूननिघाल्यानंतर भरधाव वेगाने आलेला ट्रक (एमएच 12 एम व्ही 5562) व अक्षयची दुचाकी (एम एच 12 आर एच 3746) यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत अक्षय याच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आपुलकीची जागा अॅम्बुलन्स सर्विसचे केतन वाघ यांनी जाऊन मृत तरुणास भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासातून मृत घोषित केले.
0 Comments