काम करताना विजेचा झटका; महावितरणच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

                        पुरंदर रिपोर्टर Live 

लोणी काळभोर :प्रतिनिधी 

                      महावितरण विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ प्रज्ञापाल प्रकाशराव सोनसळे (वय ४५) यांचा काम करत असताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायवाडी परिसरात घडली. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


प्रज्ञापाल सोनसळे हे महावितरणच्या लोणी काळभोर शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते शनिवारी दुपारी रायवाडी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र झटका बसला आणि ते जमिनीवर कोसळले.


घटनेनंतर त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या घटनेमुळे महावितरण विभाग, सहकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्यातून निघून गेल्याने खासगी आणि शासकीय वर्तुळात दुःख व्यक्त केले जात आहे.


Post a Comment

0 Comments