Daund | पंढरीला जाताना वारक्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थरारक CCTV…!


                पुरंदर रिपोर्टर Live 

पुणे (दौंड) :

                      काही दिवसांपूर्वी पुण्यातील दौंडमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. वारीला जाणाऱ्या प्रवाशांच्या गळ्याला कोयता लावून आरोपींनी लुटलं होतं. तसेच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पंढरपूरच्या वाटेवरच ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांसह वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आता या दोन्ही आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

ढाब्यावर आरोपींना पकडतानाचा CCTV व्हिडिओ 👇👇👇



पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दौंड पोलिसांच्या एका टीमने झडप घालून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या संपूर्ण थराराचा CCTV आता समोर आलाय. दौंड पोलिसांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तीन दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरु होता


नेमकं काय घडलं होतं?

पुण्याच्या दौंड तालुक्यातून ३ ते ४ कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. यादरम्यान, स्वामी चिंचोली परिसरात ७ भाविक चहासाठी वाहनातून खाली उतरले. नंतर त्या ठिकाणी २ अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्याकडील सोनं लुटलं. तसेच महागडे ऐवज लंपास केले. नंतर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी गुन्हा नोंद करत तपासाला सुरूवात केली.


तसेच आर्टिस्टकडून आरोपीचे रेखाचित्र तयार करून घेतले. पोलिसांनी या रेखाचित्राच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी दोघा आरोपींची नावे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस

आरोपींच्या मागावर होते. मात्र, आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. पण अखेर तपास करत पोलिसांनी दोन्ही  आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


Post a Comment

0 Comments