राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर दरोडा; दहा दरोडेखोरांकडून बारा लाखांच्या ऐवजाची चोरी..!

 

              पुरंदर रिपोर्टर Live 

नारायणगाव (पुणे) : 

            आळेफाटा येथील राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत चौगुले यांच्या घरावर ८ ते १० जणांच्या सशस्त्र दरोडेखोरांनी रविवारी (दि. ६) रात्री दरोडा टाकून १२ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना समोर आली आहे.


                     दरोडेखोरांनी सुरुवातीला वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील चौगुले मळ्यात राहत असलेल्या रमेश चौगुले यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख ८० हजार रुपये लंपास केले. त्यानंतर याच मळ्यात राहणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत चौगुले यांच्या बंगल्याचा मागील दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. सहा ते सात तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदीच्या वस्तू आणि दीड लाख रुपयांची रोख रक्कम असा १२ लाखांचा ऐवज चोरला.




याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकूण १० आरोपी असल्याचे दिसून आले आहेत. या चोरीचा तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसांत आरोपी निष्पन्न होतील.

Post a Comment

0 Comments