पुरंदर रिपोर्टर Live |
पणदरे (ता. बारामती) येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भरत नाना कोकरे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पणदरे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
भरत नाना कोकरे हे सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांचे वडील होते. पणदरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी, मुलगा आणि स्वतः भरत नाना कोकरे हे तिघेही मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. एकाच कुटुंबातील तिघांनी निवडणुकीत मिळवलेल्या या विजयाची त्यावेळी संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चा रंगली होती.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भरत नाना कोकरे यांच्या निधनाने पणदरे गावाने एक लोकप्रतिनिधी गमावला असून, त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments