Accident : भातान बोगद्याजवळ ८ वाहनांचा विचित्र अपघात , १२ पोलीस जखमी!


                             पुरंदर रिपोर्टर Live 

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 

                          मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी रात्री भातान बोगद्याजवळ सात ते आठ वाहनांचा एक विचित्र अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जात असलेल्या या ताफ्यातील वाहनांची एकामागून एक जोरदार धडक झाली. या अपघातात पाच पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक महामंडळाची बस, एक टेम्पो, एक स्कॉर्पिओ आणि एक पोलिस जीप चा देखील समावेश होता.

    

हा ताफा मुंबईहून पुण्याकडे बांगलादेशी कैद्यांना घेऊन निघाला होता. अचानक घडलेल्या या साखळी अपघातामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, १० ते १२ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

             

                    अपघात झाल्यानंतर एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. विशेष म्हणजे या अपघातात कोणताही कैदी जखमी झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, साखळी धडक एवढी जोरात होती की, वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सध्या पोलीस अधिक तपास करत असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Post a Comment

0 Comments