पुरंदर रिपोर्टर लाईव्ह
निरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहरे जिल्हा परिषद गटामध्ये आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीची चर्चा जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी कडून सविता राजेंद्र बरकडे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
सविता बरकडे, पिसुर्टी गावच्या माजी आदर्श सरपंच, यांच्या कार्याची दखल सर्व स्तरांवर घेतली गेली आहे. त्यांना १४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यात राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला पुरस्कार देखील समाविष्ट आहे. सध्या शिवशक्ती धर्मदाय संस्थेच्या सचिवपदावर कार्यरत असलेल्या सविता बरकडे, वंचित घटकातील मुलांसाठी दप्तर वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक समाजोपयोगी कामे करत आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली, समाजातील महिलांना सन्मानित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये 'सावित्री जिजाऊ अहिल्या रमाई च्या लेकिंचा' हे टायटल देऊन, साडेतीनशे महिलांना सन्मानित केले गेले. तसेच, साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना 'अण्णाभाऊ साठे पुरस्कार' देण्याची परंपरा सुरू केली आहे.
सविता बरकडे यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये आपली भूमिका निभावली आहे. त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजोपयोगी कामांचा अनुभव असून, त्या निरा कोळविहरे जिल्हा परिषद गटातून उमेदवारीच्या इच्छेसह कार्यरत आहेत. सविता बरकडे यांनी या गटाच्या विकासासाठी आपले समर्पित नेतृत्व आणि कार्य क्षमता दर्शवली आहे.
सध्याच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात सविता बरकडे यांचे नाव चर्चेत असून, त्यांना पक्ष संघटनेने आणि नागरिकांनी संधी दिल्यास गट आदर्श करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



0 Comments