पुरंदर रिपोर्टर Live
सोमेश्वरनगर / प्रतिनिधी :
बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार आयोजित सोमेश्वर प्रीमियर लीग २०२५ ही टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धा दिनांक २३ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत बारामती ग्रामीण परिसरातील जवळपास पावणेदोनशे क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला होता. सहभागी खेळाडूंना लिलाव पद्धतीने १२ संघांमध्ये विभागण्यात आले होते.या स्पर्धेत बारामतीच्या पश्चिम भागातील नावाजलेल्या संघ मालकानी सहभाग घेतला होता या संघांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या.
अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत श्रीनाथ साहेब टायगर्स वडगाव निंबाळकर संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर आपले नाव कोरले. डी. जी. लायन्स मोरगाव संघ उपविजेता ठरला. वाघळवाडी टायगर्स संघाने तृतीय, तर झीशान स्मॅशर्स करंजे संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघाचा गौरव सोमेश्वर चे संचालक संग्राम सोरटे यांनी केला व प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये १,११,१११ दिले. द्वितीय क्रमांकाचे रोख बक्षीस रुपये ५५,५५५ रोहिणी कदम ढोले यांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय चांगदेव दुर्वे व चतुर्थ शेखर भगत क्रमांकासाठी रोख बक्षिसे दिली तसेच संदीप मोडक बाळासाहेब मदने वैभव गायकवाड धीरज गायकवाड योगेश भिलारे अजित गायकवाड दिग्विजय मगर मुकेश चौधरी हर्षल जगताप प्रतापराव गायकवाड विजय कोळपे रेणुका कारंडे प्रदीप शेंडकर बाळासाहेब शिंदे सुखदेव शिंदे भरत हगवणे धनंजय गायकवाड राहुल शेडकर हनुमंत शेंडकर अमोल वायाळ दत्ता फरांदे मयूर वायाळ मंगेश कदम जीवन सावंत यांनी सहकार्य केले. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांसाठी टीव्ही, सायकल, बॅट व शूज अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेसाठी अनेक दानशूर व्यक्ती, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. मैदान उपलब्ध करून देणारे एस. एम. गलांडे यांच्यासह पंच, समालोचक, युट्युब प्रसारण टीम आणि स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले. संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी नियोजन किरण शेंडकर, सरपंच भाऊसाहेब हुंबरे, जितू सकुंडे, नितीन साखरे, पापा मुलानी, शशिकांत जेधे, दत्तात्रय सोनवणे, दिव्यतेज शेंडकर, ओम शेंडकर यांनी केले.
त्यावेळी प्रमोद काका काकडे, राजवर्धन दादा शिंदे रमाकांत गायकवाड, ऋषी गायकवाड, विलास शेंडकर, ताराचंद शेंडकर, शिवाजीराव शेंडकर , माणिकराव काळे , सुनील ढोले व सुचिता साळवे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
ही स्पर्धा बारामती ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ देणारी ठरली असून, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली. मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंना दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली. पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक भव्य व नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

0 Comments