निंबोडीचा अभिमान! सोहम शेळके ची इंडियन एअर फोर्समध्ये निवड. प्रा. लक्ष्मण हाके यांच्या हस्ते सत्कार.

 

               पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.  

लोणंद  नितीन सुळ 

        निंबोडी (ता. खंडाळा ) येथील तरुण सोहम विलास शेळके यांची इंडियन एअर फोर्समध्ये निवड झाली. या यशाबद्दल आज प्रा. लक्ष्मण हाके यांनी सोहम यांच्या निंबोडी येथील घरी जाऊन त्यांचा जाहीर सत्कार केला व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

           सोहम शेळके यांनी स्वरूपा अकॅडमीमध्ये तब्बल आठ महिने कठोर प्रशिक्षण घेतले असून, हे प्रशिक्षण भिसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. सातत्य, शिस्त व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

           शैक्षणिक प्रवासाबाबत सांगायचे झाल्यास, सोहम यांनी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबई (कळंबोली) येथे पूर्ण केले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण मालोजीराजे कॉलेज, लोणंद येथे झाले. साध्या शेतकरी कुटुंबातून येऊन देशसेवेच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सोहम यांच्या यशाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. 

         आई-वडील शेतकरी असून भाऊ शेती व्यवसायात कार्यरत आहे. या सत्कारप्रसंगी गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये विलास शेळके, दशरथ धायगुडे, किरण गोवेकर, नितीन सुळ, आदिनाथ  धायगुडे, रोहन धायगुडे, गणेश कोळेकर, अमोल गोवेकर, नवनाथ शेळके, डॉ. प्रताप गोवेकर, अभय गोवेकर, किशोर गोवेकर, गणेश गोवेकर, नारायण गोवेकर, युवराज आदींचा समावेश होता.

     सर्व उपस्थितांनी सोहम शेळके यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. इंडियन एअर फोर्समध्ये निवड होऊन निंबोडी गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments