संभाजी होळकर यांच्या संकल्पनेतील कॅलेंडरचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन. बारामतीच्या पश्चिम भागात घरोघरी कॅलेंडर वाटप.

                          पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.   

सोमेश्वरनगर |  प्रतिनिधी

          राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने २०२६ सालाचे कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले असून, या कॅलेंडरची संकल्पना, निर्मिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांची असून नुकतेच या कॅलेंडरचे प्रकाशन नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.

          प्रकाशनानंतर बारामतीच्या पश्चिम भागातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत हे कॅलेंडर पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात करत आहेत. घरोघरी जाऊन कॅलेंडर वाटप करताना पक्षाची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा जनसंपर्क अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

            याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली खंडोबाची वाडी, गडदरवाडी आणि घुमट वस्ती येथे कॅलेंडर वाटप करण्यात आले. या वेळी खंडोबाची वाडीचे सरपंच संतोष धायगुडे यांच्यासह अतुल लकडे, प्रदीप कोरडे, प्रवीण कोरडे, दादू लकडे, रोहित लकडे, सतीश कटरे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

             पश्चिम भागातील नागरिकांकडून या कॅलेंडर वाटप उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात उर्वरित वाड्या-वस्त्यांमध्येही हे कॅलेंडर पोहोचवले जाणार असल्याचे सोनू सावंत व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments