पुरंदर रिपोर्टर Live
निरा | प्रतिनिधी
निरा येथील ज्येष्ठ सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते कांतीलाल साबळे (वय ७२, रा. निरा) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निरा शहरासह परिसरातील सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कांतीलाल साबळे हे निरा शहरातील जुने आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून परिचित होते. ‘अण्णा’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या साबळे यांनी अंडी, कोंबडी व चिकन व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. व्यवसाय सांभाळत असतानाच सामाजिक व धार्मिक कार्यात ते नेहमीच हिरीरीने सहभागी होत असत.
समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी काम करणे, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे ही त्यांची ठळक ओळख होती. त्यांच्या कार्यामुळे निरा परिसरात त्यांना मानाचा स्थान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल साबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने साबळे कुटुंबावर तसेच निरा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
कांतीलाल साबळे यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता निरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

0 Comments