बारामती | निंबूत येथे पेट्रोलिंगदरम्यान मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश; चार जण ताब्यात, एक अल्पवयीन सहभागी



 सोमेश्वरनगर | प्रतिनिधी.  

            वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत–बारामती रोडवर निंबूत गावच्या हद्दीत निम्बुत छप्री कॅनॉल परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांनी संशयित बिना नंबर प्लेटची एक मोटारसायकल व तिच्यासोबत असलेली आणखी एक मोटारसायकल थांबवून चौकशी केली.

बिना नंबर प्लेट असलेल्या मोटारसायकलच्या चेसिस व इंजिन नंबरच्या आधारे माहिती घेतली असता, सदर मोटारसायकल शिरवळ पोलीस स्टेशन, जि. सातारा येथील अंतर्गत दाखल गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.



त्यानंतर दोन्ही मोटारसायकलवरील इसमांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी

१) विलास मोतीलाल हरजिन (वय २४), रा. शिरवळ, ता. खंडाळा,

२) करण विष्णु पवार (वय २४), रा. शेरे,३) लखन मोहन पवार (वय २५), रा. शिरवळ, ता. खंडाळा, 

व एक अल्पवयीन बालक अशी माहिती दिली.

अधिक चौकशीत या संशयितांवर यापूर्वी मोटारसायकल चोरी व इतर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. सराईत गुन्हेगारांच्या चौकशीत त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतून अनेक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.



सदर आरोपींना पुढील तपासासाठी शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सावळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वाळके, पोलीस हवालदार रमेश नागटिळक,  भाऊसाहेब मारकड, पोलीस अंमलदार आबा जाधव व निलेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments