सोमेश्वरनगर, प्रतिनिधी :
माळवाडी येथे सुरू असलेल्या ग्रंथ पारायण व भंडारा उत्सवाच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सोमेश्वर पंचक्रोशीतील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत समाजकार्यात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या शिवा काका फाउंडेशनच्या अध्यक्षा रेणुका स्वप्निल कारंडे तसेच फाउंडेशनचे प्रमुख स्वप्निल शिवाजी कारंडे यांना ग्रामस्थांच्या वतीने ‘भैरवनाथ भूषण माळवाडी २०२६’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की, गावातील सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच प्रेरणादायी ठरतो. त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
सन्मान स्विकारताना स्वप्निल आणि रेणुका कारंडे यांनी गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच भविष्यातही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


0 Comments