लोकनेते स्व.अजितदादा पवार यांना अनोखी श्रद्धांजली. वाघळवाडी येथे ८०० विद्यार्थ्यांना अन्नदान.


 पुरंदर रिपोर्टर Live   

सोमेश्वरनगर, प्रतिनिधी.   

            लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करत सांगवी ग्रामपंचायत सदस्य प्रणव रविंद्र तावरे, यशदा ग्रुप सांगवी व मित्र परिवार यांच्या वतीने वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रम शाळेत अन्नदान व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत तब्बल ८०० विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.

              कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नंदन सहकारी दूध उत्पादक संघ, बारामतीचे मा.चेअरमन प्रकाश तावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका मा.अध्यक्ष राजवर्धन शिंदे,  जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे, माळेगावचे संचालक योगेश जगताप, विजय तावरे, सोमेश्वर चे संचालक ऋषी गायकवाड,पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच  तेजस गाडेकर, चैतन्य तावरे यांचीही उपस्थिती लाभली.



             लक्ष्मी संकुल, यशदा ग्रुप आणि पनुकाका ड्रीम फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर महिन्याला वर्षभर अशाच पद्धतीने गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान करण्याचा संकल्प आयोजकांनी केला असून, हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

            उत्कर्ष आश्रम शाळेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी या कार्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. प्रणव तावरे, अनुप तावरे व मित्र परिवाराने अन्नदानाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे मत संचालक योगेश जगताप यांनी व्यक्त केले.

             या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments