निरा येथील हॉटेल व्यवसायिक प्रकाश (पप्पू) मोहिते यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्यसंस्कार

पुरंदर रिपोर्टर Live

निरा, प्रतिनिधी :

                 निरा येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक प्रकाश उर्फ पप्पू मोहिते यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बारामती येथील एका खाजगी दवाखान्यात गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र  काल राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

                प्रकाश मोहिते यांनी निरा येथे छोट्याशा हॉटेल व्यवसायातून आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर चांगला जम बसवला होता. “पप्पू वडेवाले” या नावाने ते निरा व पंचक्रोशीमध्ये परिचित होते. त्यांच्या साध्या, मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.

                 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, एक भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे निरा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

              अंत्यविधी आज दुपारी दोन वाजता निरा नदीकाठी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.

Post a Comment

0 Comments