सासवड : प्रतिनिधी
खानवडी येथील रहिवासी तसेच बहुजन हक्क परिषद, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संतोष डुबल यांचे वडील, कालकथित आबाजी रामचंद्र डुबल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्मानुसार त्रिशरण, पंचशील, धम्मपालन गाथा व धम्मदेशना कार्यक्रम पार पडला. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कालकथित आबाजी रामचंद्र डुबल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बौद्ध विधीनुसार अभिवादन करण्यात आले.
अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आबाजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर व कार्यावर प्रकाश टाकला. सर्व वक्त्यांनी नमूद केले की आबाजींचा स्वभाव रोखठोक, स्पष्टवक्ते आणि प्रामाणिक होता. “ओठात एक आणि पोटात एक” असा कपटी स्वभाव त्यांच्यात नव्हता. ते खानवडी गावातील एक आदर्श व सन्माननीय व्यक्तिमत्त्व होते.
आबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये कृषी व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय दादा कोलते, राष्ट्रवादीचे नेते जालिंदर भाऊ कामठे, बेलसर-माळशिरस गटाचे नवनिर्वाचित सदस्य अजय इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम आप्पा इंगळे, पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, सोमेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब आप्पा कामठे, श्री संत तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावडीचे नाना महाराज खळदकर, परिवर्तन क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल लोंढे, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे, भाजप युवा नेते अॅड. श्रीकांत ताम्हाणे, उपसरपंच तुषार झुरंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामठे, सचिव अमोल बनकर तसेच पत्रकार ए. टी. माने, अक्षय कोलते, चंद्रकांत चौंडकर, गुरुकुल अकॅडमीचे प्राचार्य संदीप टिळेकर, बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुकाध्यक्ष अनिल कदम, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, चंद्रकांत फुले, नितीन होले, विद्यमान सदस्य योगेश रासकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता होले, अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आप्पा भांडवलकर, अध्यक्ष राहुल भोंडे, दत्तात्रय सुर्यवंशी, महात्मा फुले सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश होले, पोलीस पाटील सचिन होले, भिकाजी धिवार, अतुल धिवार, शरद नेटके, कृष्णा झोंडे, लक्ष्मण जाधव, धोंडीबा डुबल, सागर चव्हाण, सेफ नदाफ, सुरज कदम, परिवर्तन क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष अक्षय खवले यांसह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संतोष डुबल यांच्या कुटुंबियांच्या वतीने उपस्थितांसाठी अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आबाजींना श्रद्धांजली अर्पण करून धम्मपालन गाथा घेण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार पुणे जिल्हाध्यक्ष तथा कालकथित आबाजी रामचंद्र डुबल यांचे सुपुत्र संतोष डुबल यांनी मानले.

0 Comments