बारामती | शिवाकाका कारंडे फाउंडेशनकडून तालुकास्तरीय वक्तृत्व व नृत्य स्पर्धेचे आयोजन. बारामती तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना व्यासपीठ.





पुरंदर रिपोर्टर Live


सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

                           स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा तसेच विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कौशल्य व कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शिवाकाका कारंडे फाउंडेशनच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व व नृत्य स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा रेणुका स्वप्निल कारंडे यांनी पुढाकार घेतला आहे.

या स्पर्धेत बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.




वक्तृत्व स्पर्धेसाठी “जाणता राजा अजितदादा पवार” हा विषय देण्यात आला असून विद्यार्थ्यांनी या विषयावर आपले विचार मांडायचे आहेत. तसेच नृत्य स्पर्धेसाठी अजितदादांवरील गाण्यावर आधारित समूह नृत्य ही थीम ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेतील विजेत्या शाळांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या शाळेला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये, तर चतुर्थ ते दहाव्या क्रमांकापर्यंतच्या शाळांना प्रत्येकी १ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नृत्य व भाषणाचा १ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ ९६५७३५३६३८ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर २५ मार्च २०२६ पूर्वी पाठवावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे बारामती तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व आणि कलागुण सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक रेणुका कारंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments