सोमेश्वरनगर | प्रतिनिधी-
बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथील खंडू लिंबाजी हाके (वय ६६) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गडदरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ते राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे माजी अध्यक्ष तसेच गडदरवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष धनंजय हाके यांचे वडील होत. खंडू हाके हे शांत, मनमिळावू व सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ९ वाजता हाके वस्ती, गडदरवाडी येथे होणार आहे.

0 Comments