मगरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अलका येळे यांची बिनविरोध निवड

.                      पुरंदर रिपोर्टर Live

सोमेश्वरनगर | प्रतिनिधी

          बारामती तालुक्यातील महत्त्वाच्या व विकसित समजल्या जाणाऱ्या मगरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अलका बबन येळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच वैशाली गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड करण्यात आली.

           उपसरपंच निवडीसाठी सरपंच विनिता हगवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी एकमताने अलका येळे यांची बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली जाधव यांनी अधिकृतरित्या ही निवड जाहीर केली.

           या बैठकीस मगरवाडी चे माजी सरपंच अजित सोरटे, रामभाऊ शेलार, रामभाऊ गोळे, सुवर्णा मगर, शैला नाईक तसेच मगरवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          निवडीनंतर बोलताना अलका येळे यांनी संग्राम सोरटे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन मगरवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments