भाजपा बारामती तालुका पश्चिम मंडल अध्यक्षपदी ॲड. शामराव कोकरे यांची निवड

 

पुरंदर रिपोर्टर. LIVE

बारामती. प्रतिनिधी

             भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा दक्षिण विभागाच्या आयोजित बैठकीत ॲड. शामराव बाजीराव कोकरे यांची भाजपा बारामती तालुका पश्चिम मंडल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवली.

             या बैठकीस पुणे जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, बाळासाहेब गरुड, वैशाली सणस, आकाश कांबळे, तसेच गजानन वाकसे, वैभव सोनवलकर, मयूर कांबळे, धनंजय आप्पा कामठे, ॲड. नितीन भामे, शहाजी कदम, पोपटराव खैरे, सुनील माने, उमेश चव्हाण यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष उपस्थित होते. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.

             निवडीनंतर बोलताना ॲड. शामराव कोकरे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीची विचारधारा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “सबका साथ, सबका विकास” या ध्येयधोरणाला अनुसरून बारामती तालुक्यातील तळागाळातील घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षकार्य अधिक जोमाने वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

             तसेच आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने पक्षाचा झेंडा अधिक उंच नेण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments