पुरंदर. निरा येथुन देशपातळीवर झेप घेत डॉ. सौरभ मंदकनल्ली क्रिटिकल केअर मेडिसिन मध्ये ऑल इंडिया २४ व्या क्रमांकाने चमकले.

 

पुरंदर रिपोर्टर Live   

निरा, प्रतिनिधी :

                पुरंदर तालुक्यातील निरा येथील डॉ. सौरभ लिलाधर मंदकनल्ली यांनी क्रिटिकल केअर मेडिसिन या स्पर्धात्मक परीक्षेत देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन करत ऑल इंडिया रँकमध्ये २४ वा क्रमांक मिळविला आहे. यासोबतच जनरल मेडिसिनमध्ये ६८६ वा क्रमांक पटकावत त्यांनी आपल्या गुणवत्तेची ठसठशीत छाप पाडली आहे.

                 डॉ. सौरभ हे निरा येथील प्रख्यात फिजीशियन डॉ. लिलाधर मंदकनल्ली व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली मंदकनल्ली यांचे सुपुत्र असून, वैद्यकीय क्षेत्रातील समृद्ध वारसा त्यांना लाभला आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेत त्यांनी एम.डी. मेडिसिनपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करत आज देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

                या यशाच्या जोरावर त्यांना नेफरोलॉजी (किडनी विकार) या विषयातील सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी बेंगळुरू येथील नामांकित मणिपाल हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला आहे.

               त्यांच्या या यशामुळे निरा व परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आरपीआयचे युवा अध्यक्ष अमोल साबळे, उद्योजक गोपाल शेट्टी तसेच पत्रकार विजय लकडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

              ग्रामीण भागातून कठोर परिश्रमाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळवत उच्च वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणारे डॉ. सौरभ मंदकनल्ली हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments