शिरूर (चांडोह) प्रथमेश भाकरे
फाकटे, मंगळुर, पारगांव व चांडोह गावचे वतनदार तसेच पंचक्रोशीत “डीडी ब्रँड” म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योगपती व युवा प्रगतशील शेतकरी दत्ता दशरथ झावरे (पाटील) यांनी सामाजिक बांधिलकी जपत भैरवनाथ ग्रामदैवताच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी तब्बल १ लाख १ हजार १११ रुपयांची रोख देणगी चांडोहकर ग्रामस्थांकडे सुपूर्त केली.
गरजु व गोरगरीब जनतेला सतत मदतीचा हात देणारे दानशूर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या या उदात्त कार्याबद्दल मुंबईकर मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
या देणगी उपक्रमासाठी विद्यमान पोलीस पाटील सुदर्शन भाकरे , माजी सरपंच नाना शेलार, माजी उपसरपंच बाळासाहेब सालकर, विठ्ठल भुजबळ, विशाल भुजबळ तसेच नेते सरपंच संपतराव पानमंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले.

0 Comments