बारामती | प्रतिनिधि
बारामती तालुक्यातील पणदरे गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर एक अनोखी आणि चर्चेची घटना समोर आली आहे. कोकरे परिवारातील आई, वडील आणि मुलगा या तिघांनीही ग्रामपंचायतीत स्थान मिळवत गावाच्या राजकारणात वेगळी छाप पाडली आहे.
यापूर्वी झालेल्या निवडणुकीत संगीता कोकरे आणि विक्रम कोकरे यांनी सदस्यपद मिळवत गावसेवेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर अलीकडेच झालेल्या चौथ्या प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भरत कोकरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा २८ मतांनी पराभव करत विजय मिळवला.
एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्य एकाच वेळी ग्रामपंचायतीत निवडून येणे ही दुर्मीळ बाब मानली जात आहे. त्यामुळे पणदरे गावाचे नाव संपूर्ण तालुक्यात चर्चेत आले असून ग्रामस्थांकडून कोकरे परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 Comments