बारामती: प्रतिनिधी.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीच्या विकासाची गती आणि तालुक्यातील सामाजिक घडी अबाधित राहावी,यासाठी यशवंत सेनेने बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. या संदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील, उद्योजक संग्राम सोरटे,दत्ता माळशिकारे व इतर पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,खासदार पार्थ पवार यांची मुंबईत देवगिरी निवासस्थानी भेट घेतली व पोटनिवडणुकीसाठी बिनशर्त पाठींबा जाहीर केल्याची माहीती प्रा.दांगडे पाटील यांनी दिली.
या निर्णयाची माहीती देताना यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, की बी.के.कोकरे प्रणित यशवंत सेना ही राज्यातील धनगर समाजाला एन.टी.चे आरक्षण मिळवून दिलेली एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. समाजाच्या एस.टी. प्रवर्ग आरक्षण अमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी यशवंत सेनेने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,विद्दमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. बारामती चौफेर विकास करताना किंवा सहकारी,पणन,स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदाधिकार्यांच्या नियुक्ती करताना येथील धनगर समाजाला वेळोवेळी संधी दिलेली आहे. सध्या बारामती तालुक्याचा सुरु असलेल्या विकासाची गती, सामाजिक एकोपा अबाधित राहाण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंत सेना बिनशर्त सक्रीय पाठींबा देत आहे.
याआधी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले,(अबाजोगाई)उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर,सचिव नितीन धायगुडे,(माळशिरस) समाधान पाटील,(मुक्ताईनगर) बाबा भोजने(जालना) दिलीप गडदे( माढा) गोविंद नरुटे(लातूर) आदींच्या राज्य कार्यकारीणीच्या ठरावान्वये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामती मतदार संघात बैठका घेण्याचे जाहीर केले.


0 Comments