बारामती ‘न्यायमंदिर चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्रातील नावाजलेले संघ सहभागी. फायनल मध्ये माळशिरस संघाने मारली बाजी.

 

पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.  

बारामती.   प्रतिनिधी.   

             बारामती वकील संघटनेच्या वतीने आयोजित ‘न्यायमंदिर चषक २०२६’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. व्ही.सी. बर्डे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती येथे करण्यात आले.

            या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे, महाड, मावळ, राजगुरूनगर, जुन्नर, कराड, सातारा, अहिल्यानगर, राहता, फलटण, वाई, दहिवडी, माळशिरस, पिंपरी चिंचवड, दौंड आणि इंदापूर येथील संघांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे बारामतीतील दोन महिला क्रिकेट संघांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धेची रंगत वाढवली.

            स्पर्धेदरम्यान युवा नेते जय  पवार, युगेंद्र  पवार, नगराध्यक्ष सचिन सातव तसेच इतर नगरसेवक उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत होते.



           अत्यंत चुरशीचे आणि रोमहर्षक सामने या स्पर्धेत पाहायला मिळाले. अंतिम निकालात माळशिरस संघाने विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांक मिळवला, तर बारामती ‘A’ संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक श्रीकांत पन्हाळे 11 सातारा संघाने, तर चतुर्थ क्रमांक अहिल्यानगर संघाने मिळवला.


स्पर्धेतील मानकरी खेळाडू :

मॅन ऑफ द मॅच (फायनल) : तन्मय देव (माळशिरस)

मॅन ऑफ द सिरीज : शक्ती माने (माळशिरस)

बेस्ट बॅट्समन : शक्ती माने (माळशिरस)

बेस्ट बॉलर : डी. एस. माने (माळशिरस)

बेस्ट फिल्डर : अनुराग खाडे (बारामती)

            स्पर्धेतील सर्व सामने यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बारामतीतील सिनियर व ज्युनियर वकील, वकील संघटनेची कार्यकारिणी तसेच क्रिकेट कमिटीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे यांनी प्रास्ताविक केले, तर क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष ॲड. योगेश राऊत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ॲड. समीर शेख यांनी केले.

Post a Comment

0 Comments