धर्माबाद. सोमेश स्वामी.
क्रिकेट सट्टेबाजीविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत धर्माबाद व तेलंगणा (निझामाबाद) पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. मागील एक वर्षापासून फरार असलेला निझामाबाद येथील क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी याला आज (७ एप्रिल) धाडसी कारवाईत ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार धर्माबा द पोलीस ठाण्याचे पोलीस निरी क्षक सदाशिव भडीकर यांनी सट्टे बाजांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. याआधी ३१ मार्च रोजी सचिन सत्यम उतरवार याला अटक कर ण्यात आली होती. आता दुसऱ्या मोठ्या आरोपीला पकडण्यात आल्याने सट्टेबाजीच्या जाळ्यात खळबळ उडाली आहे.
निझामाबाद येथील 5th Town पोलीस ठाणे येथे २०२५ मधील दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरो पी मनोज मानधनी हा गेल्या एक वर्षापासून फरार होता. तो धर्माबाद येथे आल्याची गोपनीय माहिती मिळताच धर्माबाद व निझामाबाद पोलिसांनी संयुक्त सापळा रचला. आरोपीच्या घरावर छापा टाकला असता त्याने दरवाजा आतून बंद करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
सदर आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपीला निझामा बाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संयुक्त कारवाई मुळे सट्टेबाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उर्वरित फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.
जनतेची अपेक्षा सट्टेबाजीमुळे समाजात गुन्हेगारी वाढत असून तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे. अनेकांनी यात मोठया प्रमाणात पैसा गमावल्या मुळे आपले जीवन संपविले आहे. अशा गुन्हेगारीवर कठोर कारवाई करून संपूर्ण सट्टा रॅकेट उध्वस्त करावे, तसेच फरार आरोपींना तातडीने अटक करून कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तेलंगणा पोलिसांना हवे असलेल्या पूर्ण आरोपी पैकी चालू आठवड्यात दोन आरोपीना अटक झाली आहे. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता आरोपीची संख्या वाढनार असून धर्माबाद पोलीस व तेलंगणा पोलीस अशा दोघांनीही संयुक्त कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळत आहेत. उर्वरित आरोपी आज जरी फरार असले तरी त्यांची जेलवारी निश्चित मानली जात आहे. अटक टाळण्यासाठी फरार आरोपी राजकीय आश्रय शोधत असले तरी राजकीय नेत्यांनी सावध भूमिका घेतल्यामुळे राजाश्रय मिळणे कठीण बनले आहे.


0 Comments