बारामती, प्रतिनिधी.
बारामती येथून श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे एसटी महामंडळाची बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी दर पौर्णिमेला बसफेरी सुरू करण्याची मागणी भाविक भक्त व नागरिकांकडून सातत्याने होत होती.
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा विषय पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार या प्रश्नाला गती मिळाली. त्यानंतर बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी पाठपुरावा करून अखेर दररोज बस सेवा सुरू करण्यात यश मिळवले.
या बस सेवेच्या शुभारंभप्रसंगी सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे, वाहतूक निरीक्षक प्रविण माळशिकारे, विशाल सावंत, वाहतूक नियंत्रक गजानन मोहिते, दिग्विजय कोकरे, निलेश तावरे, गणेश काशिद, अभिजीत देगलूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच बस चालक सरफराज झारी व वाहक दत्तात्रय वाळुंजकर यांच्यासह बारामती व एमआयडीसी आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त व प्रवासी उपस्थित होते.
या नव्या बस सेवेच्या माध्यमातून गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


0 Comments