इंस्टाग्रामवरील भाईगिरी थांबवा, नाहीतर थेट गुन्हा दाखल-एसपी अबीनाश कुमार.


पुरंदर रिपोर्टर Live 

 नांदेड. सोमेश स्वामी.   

                 सोशल मीडियावर भाईगिरी, गुंडगिरीचे समर्थन करणारे पोस्ट टाकून दहशत निर्मा ण करणाऱ्यांविरोधात आता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी या बाबत स्पष्ट आणि कडक इशारा देत शह रातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्या साठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्या चे सांगितले.

                 अलीकडे इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या माध्यमांवर काही युवकांकडून शस्त्रांचे प्रदर्शन, धमकीचे व्हिडिओ, तसेच गुन्हेगारांचे समर्थन करणारे पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या प्रकारा मुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू केले आहे.



                  "सोशल मीडियावर गुंडगिरीचे उदात्ती करण करणे, धमकी देणे किंवा कायदा हातात घेण्यास प्रवृत्त करणे सहन केले जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये आयटी अॅक्टसह संबंधित कायद्यांनुसार थेट गुन्हे दाखल केले जातील," असे पोलीस अधीक्षक

                   अबीनाश कुमार यांनी स्पष्ट केले. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संशयितांवर लक्ष ठेवणे, धरपकड मोहीम राबविणे, तसेच रात्रीची गस्त वाढविणे यांसारख्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

                   नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारी पाळावी, भडकावू पोस्ट टाळाव्यात आणि कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

                  *पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांचा इशारा* सोशल मीडियावर गुंडगिरीचे समर्थन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणारशस्त्रांचे प्रदर्शन, धमकीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईआयटी अॅक्ट व इतर कायद्यांनुसार कठोर पावले उचलली जाणारविशेष पथकाद्वारे सोशल मीडिया सतत निरीक्षणाखाली गुन्हेगारांवर धरपकड व प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. नांदेड शहरातील सोशल मीडियावर वाढत चाललेली गुंडगिरी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी कडक पाऊल उचलत भुरट्या भाईगिरी करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments