Daund । महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हा सहकार्याध्यक्ष पदी अवधूत चिलवंत.

पुरंदर रिपोर्टर Live 

दौंड  प्रतिनिधी ; 

                 महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, यामध्ये  अवधूत चिलवंत  यांची 'पुणे जिल्हा सहकार्याध्यक्ष' म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली .

                अवधूत चिलवंत हे गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून, क्रीडा शिक्षकांच्या हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

                 आपल्या निवडीनंतर बोलताना अवधूत चिलवंत म्हणाले की, "महासंघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरवत मी पुणे जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी कटिबद्ध राहीन."

                  या निवडीबद्दल शारीरिक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक वृंद, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात महासंघाचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments