बारामती। महागाई, इंधन दरवाढ,कांद्याच्या हमीभावासाठी उद्या बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस(श.प) गटाचा जाहीर निषेध मोर्चा; युगेंद्र पवार यांची उपस्थिती*


 पुरंदर रिपोर्टर Live

बारामती | प्रतिनिधी 

              बारामती शहरात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने महागाईविरोधात जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच कांद्याला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

               या मोर्चामध्ये शेतकरी, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडणार आहे.



               सकाळी ९ वाजता बारामती नगरपालिकेसमोरील तीन हत्ती चौक येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तसेच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक भाराकडे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलनात्मक मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments