सोमेश्वरनगर । उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी


सोमेश्वरनगर | रमेश कदम

            वाघळवाडी येथील उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित मनोगते, भाषणे आणि विचार मांडत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.



            यावेळी वक्त्यांनी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता, मागासवर्गीयांसाठी आरक्षण तसेच सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.



             कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले.

             या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षकांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments