पुरंदर ।प्रतिनिधी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर सोपानराव कामठे (वय ६३, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांचे आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक निधन झाले आहे त्यांच्या या अकाली जाण्याने पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, जालिंदर कामठे हे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असत परंतु, आज अकरा वाजले तरी ते मॉर्निंग वॉकला गेले नव्हते आणि त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता यामुळे संशय आल्याने घरातील नातेवाईकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला
त्यावेळी जालिंदर कामठे हे खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले कामठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विशेष म्हणजे, जालिंदर कामठे यांच्या आई हौसाबाई कामठे यांचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते कामठे कुटुंब या पहिल्या दुःखातून सावरत असतानाच, आता जालिंदर कामठे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनामुळे कोंढवा परिसर आणि पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



0 Comments