खंडोबाचीवाडी, प्रतिनिधी :
खंडोबाचीवाडीचे माजी सरपंच अंकुश लकडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनामुळे खंडोबाचीवाडीसह परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
सरपंच म्हणून कार्यरत असताना अंकुश लकडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. विविध विकासकामांना गती देतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. गावाच्या हितासाठी सातत्याने पुढाकार घेणारे आणि गोरगरीब, गरजू नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
शांत, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे गावाच्या सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


0 Comments