वडगाव। खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व अटकेची भीती दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई


पुरंदर रिपोर्टर Live 

सोमेश्वर। रमेश कदम 

             खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटक होईल, अशी भीती दाखवून एका व्यक्तीकडून ₹१२ हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

             याप्रकरणी विजय हिंदुराव साळुंखे (वय ३६, रा. वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०८(६)(७), ३५१(२)(३) व ३१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद मारुती नामदास (रा. विकासनगर, वाणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याने स्वतःचे पोलिसांशी संबंध असल्याचे भासवून फिर्यादीला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटक होणार असल्याची भीती दाखवली. या भीतीचा गैरफायदा घेत त्याने फिर्यादीकडून ₹१२ हजारांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. तसेच त्यानंतरही अधिक पैशांची मागणी करून पुन्हा खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

               घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विनोद नामदास याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपोसई वारुळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments