खंडोबाचीवाडी । सोनाबाई लकडे यांचे वृद्धापकाळाने निधन.

 


पुरंदर रिपोर्टर Live  

सोमेश्वरनगर : रमेश कदम

          खंडोबाची वाडी येथील सोनाबाई दादासाहेब लकडे (वय ८०) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लकडे कुटुंबीयांसह नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

           सोनाबाई लकडे यांच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा व सामाजिक कार्यकर्ते अतुल लकडे तसेच भगवानांना सोसायटीचे संचालक राजेंद्र लकडे यांच्या त्या मातोश्री होत.



           त्यांच्या तीन मुलींमध्ये एक गृहिणी असून दोन मुली आरोग्य सेविका आहेत. तसेच कुटुंबातील एका सुनेचे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असून दुसरी सून गृहिणी आहे.

            सोनाबाई लकडे यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी (दि. ११) सायंकाळी ८ वाजता खंडोबाची वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments