Someshwarnagar । कदमवस्ती येथे महिलांसाठी आर्थिक साक्षरता व उद्योजकता विकास कार्यशाळा.


पुरंदर रिपोर्टर Live

सोमेश्वरनगर रमेश कदम

           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गावातील महिलांसाठी आर्थिक साक्षरता व उद्योजकता विकास या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.




         या कार्यशाळेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बारामती तालुका व्यवस्थापिका धनश्री काळे व सहयोगिनी अर्चना गायकवाड यांनी महिलांना विविध उद्योग-व्यवसायाच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचत, आर्थिक नियोजन आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

         या कार्यशाळेला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती तालुका उपाध्यक्ष सचिन जगताप, महिला बचतगटाच्या अध्यक्षा स्वाती भिसे, तसेच उज्वला नलवडे, पूजा शिंदे, मनिषा साखरे, आरती पोकळे, सुषमा कदम, राणी तांबे व इतर महिलांच्या वतीने करण्यात आले.

       यावेळी समीर कदम, संग्राम शिंदे व प्रथमेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments