Pune | प्रेमसंबंधातील संशय अन् मानसिक त्रास;१७ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल, तरुणावर गुन्हा दाखल…


 

पिंपरी-चिंचवड:प्रतिनिधि 

                    प्रेमसंबंधातून निर्माण झालेला संशय आणि त्यातून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवडमधील चिंचोली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटनास्थळ: चिंचोली परिसर, पिंपरी-चिंचवड (पुणे)

 आरोपीचे नाव: साहिल हनुमंत दणाणे (वय २१, रा. देहूगाव)

 पोलीस ठाणे: देहूरोड पोलीस ठाणे

                   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल दणाणे आणि पीडित अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. संवादाचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधांमध्ये झाले. मात्र, काही काळानंतर साहिल मुलीवर वारंवार संशय घेऊ लागला. या संशयातून तिच्यावर मानसिक दबाव आणणे, धमक्या देणे आणि त्रास देणे असे प्रकार सुरू झाले.

सततच्या मानसिक तणावाला व त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी साहिल दणाणे याच्याविरोधात अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास देणे, धमकावणे आणि तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments