बारामती-सोमेश्वरनगर। सोमेश्वराच्या दर्शनानंतर जय पवारांची ‘चाय कॉर्नर’ला सदिच्छा भेट; स्थानिक तरुणांशी साधला संवाद.


पुरंदर रिपोर्टर Live. 

सोमेश्वरनगर । रमेश कदम.  

           पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून करंजे येथील सोमेश्वर मंदिरातील स्वयंभू सोमनाथाच्या दर्शनासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी सोमेश्वरनगर येथील प्रसिद्ध ‘चाय कॉर्नर’ला सदिच्छा भेट दिली. जय पवार यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिक व उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.




   श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी विशेष पूजेनिमित्त जय पवार सोमेश्वर मंदिरात आले होते. स्वयंभू सोमनाथाचे दर्शन घेतल्यानंतर विधीवत पूजा करून त्यांनी सोमेश्वरनगर येथील ‘चाय कॉर्नर’ला भेट दिली. यावेळी त्यांनी चहाचा आस्वाद घेत स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच तरुणांशी मनमोकळा संवाद साधला.

 यावेळी जय पवार यांनी नागरिकांच्या विविध विषयांवरील चर्चा जाणून घेतल्या. त्यांच्या साध्या, मनमिळावू आणि आपुलकीच्या वागण्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, स्थानिक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे चहाचा आस्वाद घेत विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.

Post a Comment

0 Comments