पुणे । अजित जगताप यांची पुणे जिल्हा एल्गार कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुरंदर रिपोर्टर live 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी


सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले, गरिबी आणि कष्टाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले तसेच स्वतः दुसऱ्यांकडे काम करून कामगारांच्या श्रमाची व त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्याची जाणीव असलेले अजित जगताप यांची पुणे जिल्हा एल्गार कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एल्गार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांच्या हस्ते जगताप यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

अजित जगताप हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात येते. बँकेतील व्यवहार असोत किंवा शासकीय कार्यालयातील कामकाज, सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणींकडे केवळ दुसऱ्याचे काम म्हणून न पाहता ते स्वतःचे काम समजून मदतीसाठी पुढे येण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.




सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्याची त्यांची कार्यपद्धती आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कामगारांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे विषय तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या विविध अडचणींची प्रत्यक्ष जाणीव असलेल्या जगताप यांच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून ते सक्रियपणे काम करतील, अशी अपेक्षा कामगार बांधवांकडून व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याने सामाजिक तसेच कामगार क्षेत्रातील आपल्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित जगताप यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments