बारामती-खंडोबाचीवाडी । प्रज्वलच्या स्मृती जपण्यासाठी विशाल लकडे यांचा शाळेला ५० हजारांचा मदतीचा हात; विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधांसाठी देणगी; चार वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम.


पुरंदर रिपोर्टर Live.  

सोमेश्वरनगर रमेश कदम 

         आपला लहान मुलगा (प्रज्वल) ला काळाने हिरावून नेले असले, तरी त्याच्या स्मृती सदैव जिवंत राहाव्यात, या भावनेतून विशाल लकडे रा. खंडोबाचीवाडी गेल्या चार वर्षांपासून प्रज्वलच्या स्मृती प्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी खंडोबाचीवाडी येथील माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधांसाठी सुमारे ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली.

        खंडोबाचीवाडी, गडदरवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही मदत शाळेच्या मुख्याध्यापक मोहन कोकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास हातभार लागणार आहे.




         प्रज्वलच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या चार वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मदत देणे, वृक्षसंवर्धनासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत प्रज्वलच्या आठवणींना विधायक उपक्रमांची जोड देण्याचा प्रयत्न विशाल लकडे यांच्याकडून केला जात आहे.

        यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विशाल लकडे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक वृंद भगवान कुसेकर, अमोल गायकवाड, लकडे मॅडम, गायकवाड मॅडम,अमोल धायगुडे, अमर पिंगळे याचबरोबर खंडोबाचीवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ, नवयुवक तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments