Baramati| बारामती हादरली! बाबुर्डीत माजी महिला सरपंचासह ,६५ वर्षीय महिलेचा झोपेतच गळा चिरून निघृण खून; परिसरात खळबळ


 बारामती:प्रतिनिधि 

       बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील शेरेवाडी परिसरात आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. घराच्या ओसरीबाहेर झोपलेल्या बाबुर्डीच्या माजी सरपंच इंदुबाई मारुती लडकत (वय ७५) आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) या दोन ज्येष्ठ महिलांचा अज्ञात इसमाने झोपेतच गळा चिरून निघृण खून केला. एकाच वेळी दोन महिलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळल्याने संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.  

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी सरपंच इंदुबाई मारुती लडकत (वय ७५ वर्षे) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५ वर्षे) या दोन्ही महिला रात्री आपल्या घराबाहेर झोपलेल्या होत्या. याच दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला

आज सकाळी शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने दोघांचाही गळा चिरून जागीच ठार केले होते.  
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. मृत इंदुबाई लडकत यांचा मुलगा हा बारामती तालुक्यातच ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे.  

दरम्यान, दोन्ही ज्येष्ठ महिलांची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस सर्व बाजूने तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments