लोणंद : प्रतिनिधी.
स्व. विनायकराव शेळके पाटील यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. विनायकराव शेळके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, लोणंदच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून लोणंद येथील प्रतिभा पवार महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शौचालयासाठी पाणी साठवणुकीसाठी आवश्यक असलेली १५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ट्रस्टच्या वतीने भेट देण्यात आली.
महाविद्यालयाच्या मैदानाची डागडुजी व सपाटीकरण करण्यासाठी युवा नेते सागर गालिंदे यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला. तसेच युवा नेते रोहित शेळके यांनी मैदानासाठी आवश्यक मुरूम उपलब्ध करून दिला. या सामाजिक उपक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
स्व. विनायकराव शेळके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, लोणंदच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच गरजू व्यक्तींना विविध माध्यमातून मदत केली जाते. स्व. विनायकराव शेळके पाटील यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या माध्यमातून केला जात आहे.
यावेळी युवा नेते रोहित शेळके पाटील, युवा उद्योजक अविनाश लोखंडे, मनोज क्षीरसागर, निलेश बुनगे, प्रणित परदेशी, आर्या शेळके, गणेश रासकर, शिक्षक अंकुश रासकर, गोळे सर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


0 Comments