Baramati । निरावागज नं. २ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र देवकाते यांची निवड. ‌

पुरंदर रिपोर्टर Live. 

बारामती प्रतिनिधी.  

             निरावागज नं. २ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, निरावागज या संस्थेच्या चेअरमनपदी  राजेंद्र देवकाते यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पद्मश्री शिंदे  यांनी काम पाहिले.

या निवडीप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मदनराव देवकाते ,गुलाबराव देवकाते, ज्ञानदेव देवकाते,सुरेश देवकाते, बाळासाहेब देवकाते, चंद्रराव देवकाते, जयपाल देवकाते, विलास देवकाते, मोहन धायगुडे, काकासो देवकाते, विठ्ठल देवकाते, रमेश देवकाते, उद्धव डाळ, महेश डोंबाळे, गणेश मारकड, नंदकुमार भोसले आणि अलीभाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र देवकाते यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांना सहकार्य करणे आणि सहकार क्षेत्रातील संस्थेची प्रगती साधणे यासाठी नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र देवकाते यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक कार्य होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments