राजगड प्रतिनिधी.
राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) प्रकरणातील फरारी आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. तुषार नामदेव हंबीर असे या आरोपीचे नाव असून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे शहरातील हडपसर परिसरातून त्याचा शोध घेण्यात आला.
राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२६ अन्वये विविध कलमांसह मोक्का कायदा, पॉक्सो कायदा आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील तुषार हंबीर हा फरारी होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तपास केला. त्यानंतर त्याला पुणे शहरातून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भोर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष तोडकर, रामदास बाबर, पोलीस हवालदार अमोल शेडगे, तुषार भोईटे, राजू मोमीन तसेच पोलीस शिपाई भारत मोहोळ आणि चेतन पाटील यांचा सहभाग होता.

0 Comments