Purndar | लोकेश धुमाळ यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी निवड; संभाजी होळकर-दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 



पुरंदर : पुरंदर तालुक्यातील जेऊर गावचे युवा उद्योजक लोकेश दीपक धुमाळ यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते धुमाळ यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,अमित झेंडे सभापति पंचायत समिति पुरंदर,अजिंक्य कड युवक उपाध्यक्ष तसेच सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


लोकेश धुमाळ यांची युवा उद्योजक आणि प्रगतशील बागायतदार म्हणून ओळख आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या धुमाळ यांच्यावर आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून युवक व विद्यार्थ्यांशी संबंधित कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


युवा कार्यकर्त्याला संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांकडून आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. लोकेश धुमाळ यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेच्या माध्यमातून युवकांमध्ये काम करण्याची त्यांना नवी संधी मिळाली आहे. त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments