निबुंत । संभाजी काकडे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड; निंबुतच्या शिरपेचात मानाचा तुरा!

 


पुरंदर रिपोर्टर Live

सोमेश्वरनगर रमेश कदम 

           बारामती तालुक्यातील निंबुत येथील दै पुण्यनगरीचे पत्रकार सोमेश्वरनगर प्रतिनिधी संभाजी नारायण काकडे यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे निंबुत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

          संभाजी काकडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि जनहिताचे विषय सातत्याने मांडले आहेत. पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

       विशेष कार्यकारी अधिकारीपदाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांना सहकार्य करताना गावातील सामाजिक सलोखा, शांतता व बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांना योगदान देता येणार आहे. तसेच नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि प्रशासन व जनता यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

      सामान्य कुटुंबातून पुढे येत पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश निंबुत गावासाठी अभिमानास्पद ठरत आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार, पत्रकार बांधव आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments